बातम्या

ढिंढोरा बाजे रे' या गाण्याने नाही तर जया बच्चन यांच्या एक्सप्रेशन्सनं वेधले चहात्यांच लक्ष

It was not the song Dhindhora Baje Re


By nisha patil - 7/25/2023 6:48:19 PM
Share This News:



अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह   यांचा चित्रपट  रॉकी और रानी की प्रेम कहाणी  हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला असून या चित्रपटामधील काही गाणीही रिलीज झाली आहेत. नुकतेच या चित्रपटातील  'ढिंढोरा बाजे रे' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे, या गाण्यामध्ये आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे. पण या गाण्यातील जया बच्चन यांचे एक्सप्रेशन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.ढिंढोरा बाजे रे' या  गाण्यातील जया बच्चन यांच्या एक्सप्रेशन्सचा स्क्रीनशॉट  ट्विटरवर शेअर करुन, एका नेटकऱ्यानं लिहिलं, 'एवढं पण खरं दिसायचं नव्हतं'. तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं- 'संपूर्ण गाण्यात जया बच्चन अशाच दिसल्या आहेत.' काही नेटकऱ्यांनी मिम्स देखील शेअर केले आहेत.


ढिंढोरा बाजे रे' या गाण्याने नाही तर जया बच्चन यांच्या एक्सप्रेशन्सनं वेधले चहात्यांच लक्ष