बातम्या

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

Jaggery controls these diseases


By nisha patil - 3/25/2024 7:28:01 AM
Share This News:



अनेकजण घरामध्ये काही गोड पदार्थ बनवायचे असतील तर साखरेचा वापर करतात. पण साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आपण घरात कोणताही पदार्थ बनवत असाल तर साखरेऐवजी गुळाचा वापर करा. एवढेच नाही तर गुळ खाल्याने आपले अनेक आजार नियंत्रणात येतात. त्यामुळे गुळ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
१) तुमच्या शरीरात जर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर गूळ-शेंगदाणे खा. यामुळे हिमोग्लोबिन लवकर वाढते.

२) एखाद्या आजारामुळे जर तुम्हाला शारीरिक अशक्तपणा आला असेल तर गूळ खाल्ल्यास फायदा होतो.

३)  काही आजारामुळे आपल्या शरीरातील धातुंची झीज होते. गुळ खाल्याने ही झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो.

४) थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो.

५) मासिक पाळीत अनेक महिलांचे पोट दुखते त्यावेळी जर त्यांनी  तीळ-गूळ खाल्ले तर त्यांचे पोट दुखणे कमी होते.

६) रोज रात्री झोपताना गुळ खाल्ला तर तुमची त्वचा उजळण्यास मदत होते.

७) जेवणानंतर एखादा गुळाचा खडा खाल्यास पचन शक्ती सुधारते.


‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण