बातम्या

जग्गूदादा उर्फ जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव

Jaggudada aka Jackie Shroff runs in Delhi High Court


By nisha patil - 5/14/2024 8:50:11 PM
Share This News:



सुप्रसिद्ध आणि चहात्यांचा जग्गूदादा आपल्या वेगळ्याच अंदाजासाठी ओळखला जातो. त्याची बोलण्याची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळेच जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा ठरतो. जॅकी श्रॉफ हा आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. आता याच शब्दावरून जग्गूदादाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे
या याचिकेत आपल्या खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. जॅकी श्रॉफने म्हटले की, सोशल मीडिया आणि एआय ॲप्सशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो  किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी केली. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेवर आता 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.
.


जग्गूदादा उर्फ जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव