बातम्या

वि.मं व्हन्नूर ता.कागल शाळेत आज शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

Jai Malhar in Jejuri in the palanquin of Saint Dnyaneshwar Maharaj


By nisha patil - 6/16/2023 7:39:55 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी   पहिली प्रवेश घेतलेल्या मुलांची गावातून सजवलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली. पं. स.कागलचे गटविकास अधिकारी *सुशील संसारे * यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागत मुलांचे स्वागत करण्यात आले.विशेष बाब म्हणजे साहेबांनी मिरवणुकीतील ट्रॅक्टरचे सारथ्य स्वतः केले..तसेच शिक्षक ,शिक्षिका,पालक यांचेबरोबर लेझिम खेळताना साहेब दंग झाले.  
   साहेबांच्या हस्ते मुलांना पाठ्यपुस्तकं व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.                        कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  दिपाली घोरपडे उपाध्यक्ष संभाजी खोत व सर्व शाळा व्य. सदस्य ,सरपंच सौ पूजा मोरे  व ग्राम पंचायत सदस्य ,ग्रामसेवक शमोरेश्वर जंगम व सर्व कर्मचारी.मुख्याध्यापिका सौ माधवी रानडे व शिक्षक वृंद , श्री रामचंद्र रेवडे,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
   कार्यक्रमात संदीप लोंढे, श्री डी एस खोत  सौ पूजा मोरे व गट वि. अ. संसारे साहेब यांची मनोगते झाली. प्रास्ताविक श्री साखळकर यांनी  तर आभार श्री सासमिले यांनी मानले.


वि.मं व्हन्नूर ता.कागल शाळेत आज शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न