बातम्या

रेशनच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्यासह सात जणांना कारावासाची शिक्षा !

Jail sentence to seven people including IAS officer who attacked ration grains

By nisha patil - 2/3/2024 7:50:55 PM
Share This News:

रेशनच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्यासह सात जणांना कारावासाची शिक्षा ! 

अकोला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल; 24 वर्षांनंतर लागला निकाल, 

या निकालानंतर एकच खळबळ उडाली.

  रेशनच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्यासह सात जणांना कारावासाची शिक्षा !
गरिबांच्या रेशन धान्यावर डल्ला मारणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांसह सात जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात एक आयएएस अधिकारी आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्यासह सात जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रेशन धान्य हे सरकारी धान्य गोदाम आणि इतर संबंधित ठिकाणी पोहोचवण्याऐवजी या संशयित आरोपींनी संगनमताने रेशन धान्य परस्पर गायब केले होते. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रेशनच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्यासह सात जणांना कारावासाची शिक्षा !