बातम्या

सोमवारच्या जनता दरबारासाठी मंत्रिमंडळ बैठकीमुळे मी उपस्थित नाही परंतु; जनता दरबार होणार...!

Janata Durbar will be held


By nisha patil - 3/2/2024 1:07:17 PM
Share This News:



सोमवारच्या जनता दरबारासाठी मंत्रिमंडळ बैठकीमुळे मी उपस्थित नाही परंतु; जनता दरबार होणार...!
          
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रसिद्धी पत्रक
          
नागरिकांनी समस्या अधिकाऱ्यांकडे मांडाव्यात  
 
                      
कोल्हापूर, दि. २:  सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे त्यादिवशी होणाऱ्या जनता दरबारासाठी मी उपस्थित राहू शकत नाही. तसेच; उपजिल्हाधिकारी आणि तत्सम अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी जाणार असल्यामुळे ते  जनता दरबाराला उपस्थित असणार नाहीत. परंतु; हा जनता दरबार होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जनता दरबारात यावे व नूतन जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे,  जिल्हा पोलीस प्रमुख श्री. महेंद्र पंडित, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा; प्रशासक डाॅ. के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांच्यासह इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे समस्या मांडाव्यात,  असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या रोजी मी स्वतः जनता दरबारासाठी उपस्थित राहणार नाही. परंतु; . हे सर्व अधिकारी आपली निवेदने स्वीकारून एक महिन्याच्या आत संबंधित तक्रारींना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील. या जनता दरबारात आलेल्या सर्व तक्रारींचा आढावा मी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच चार मार्च २०२४ रोजी होणाऱ्या जनता दरबारात घेणार आहे.
           
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, मी या जनता दरबारासाठी उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. परंतु; परंतु नागरिकांनी आपल्या समस्या आणि गा-हाणी घेऊन जनता दरबारासाठी उपस्थित राहावे. ते ऐकून घेण्यासाठी अधिकारी उपस्थित असतील, याची कृपया नोंद घ्यावी......!


सोमवारच्या जनता दरबारासाठी मंत्रिमंडळ बैठकीमुळे मी उपस्थित नाही परंतु; जनता दरबार होणार...!