बातम्या
शिंदेंच्या नातवाला डेट करतीये जान्हवी कपूर
By nisha patil - 7/18/2023 7:07:46 PM
Share This News:
अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी ही शिखर पहाडियाला डेट करत आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकतीच जान्हवी ही शिखरसोबत स्पॉट झाली. शिखर आणि जान्हवी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते दोघे एकाच गाडीमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. जान्हवी आणि शिखर हे अर्जुन कपूरच्या घरी जाताना दिसले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिखर आणि जान्हवी या दोघांनीही ट्वीनिंग केलं आहे. दोघेही व्हाईट आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. शिखर आणि जान्हवी हे अर्जुन कपूरच्या घरी जाताना दिसले. त्यामुळे आता या दोघांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
नेमका कोण आहे शिखर पहाडिया तर
शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तो स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. अनेक वेळा शिखर आणि जान्हवी यांना एकत्र स्पॉट केलं जातं. त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
शिंदेंच्या नातवाला डेट करतीये जान्हवी कपूर
|