बातम्या
राज्याच्या नवीन महिला धोरणात आता जन्मदात्रीला मिळनार सन्मान
By nisha patil - 12/25/2023 7:10:03 PM
Share This News:
राज्याच्या नवीन महिला धोरणात आता जन्मदात्रीला मिळनार सन्मान
राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या धोरणानुसार आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. हे धोरण जाहीर होत असते याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन वेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला होता, मात्र पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादाभाई आदींनी या धोरणामध्ये सुधारणा सुचविल्या होत्या. त्यामुळे हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही. मात्र दुसरा बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकार होते पण जन्मात आता आईच्या नावाचा उल्लेख करणार सक्तीचे नव्हते मात्र नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला. त्या स्वतः कायम आईचे नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचे नाव लावत आले आहेत. त्यांच्या मंत्री दानाची पाटी ही आदिती वर्धा सुनील तटकरे अशी आहे आता राज्यात या धोरणानंतर अशीच पार्टी आणि तसेच नाव लिहावे लागेल. ज्यामुळे मातृशक्तीला एक सन्मान मिळणार आहे. मात्र या धोरणाची राज्य सरकारला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. याशिवाय या धोरणात उद्योगात तीस टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेने लाभ सर्व रस्त्यांवर 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्याच्या नवीन महिला धोरणात आता जन्मदात्रीला मिळनार सन्मान
|