बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यापूर्वी जरांगेनी खाल्लं होतं मटण...?

Jarangeni had eaten mutton before breaking his hunger strike at the hands of the Chief Minister


By nisha patil - 3/26/2024 3:38:13 PM
Share This News:



मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘ मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी ( जरांगे यांनी) मटण खाल्लं.  

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलात’ असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात टीका   केली आहे 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यापूर्वी जरांगेनी खाल्लं होतं मटण...?