बातम्या
जास्वंद मोदक
By nisha patil - 9/21/2023 7:30:26 AM
Share This News:
घटक
45 मिनिटे
20 मोदक
मोदकाच्या पारीसाठी साहित्य-
2 कप बासमती तांदूळ पीठ
2 कप पाणी
2 टीस्पून तूप
1 चिमुटभर मीठ
गुलाबी, हिरवा, पिवळ फुड कलर
सारण साहित्य -
2 कप खोबऱ्याचा चव
1 कप गुळ
1 टीस्पून वेलची पूड
3 टीस्पून भाजलेली खसखस
1 टीस्पून साजूक तूप
कुकिंग सूचना
स्टेप 1
एका कढईत खसखस भाजून त्यात खोबऱ्याचा चव व गुळ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात वेलची पूड घालून परतून घ्यावे.
स्टेप 2
तांदूळ पीठ चाळून घ्यावे. एका भांड्यात 2 कप पाणी घालून त्यात मीठ व तेल घालून एक उकळी आणून त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करावे व 2 मिनिटं झाकून ठेवावे. आता गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट करावे.
स्टेप 3
आता थोडी उकड घेऊन चांगली मळावी. मळताना त्यात आवश्यक ते फुड कलर घालून मळावे. आता गुलाबी उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याची पातळ अशी हाताने वाटी करून त्यात सारण भरून ती बंद करावी.
स्टेप 4
सारण भरलेला गोळा चपटा करून त्याचे सुरी किंवा टुथपिकच्या सहाय्याने पाच समान हलक्या रेषा काढून घ्यावा. पुढील भाग बोटाने चपटा करून पाकळ्याचा आकार देणे.
स्टेप 5
हातावर थोडी पांढरी उकड घेऊन ती वळून त्यावर थोडी पिवळी उकडीने वळणे. हा पराग जास्वंद फुलामधे हलके होल करून त्यात रोवणे. हिरवी उकड हाताने पातळ पानाच्या आकारात करून त्यावर पानांच्या रेषा सुरीच्या साह्याने हलक्या पाडाव्या.
स्टेप 6
स्टिमरमध्ये पाणी घालून त्यावर चाळणी ठेऊन त्यात तयार मोदक व पाने ठेऊन 15 मिनिटे वाफवून घ्यावे.
स्टेप 7
जास्वंद मोदकावर साजूक तूप घालून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
जास्वंद मोदक
|