बातम्या

शाहुवाडी तालुक्यातील जवान महेश रामचंद्र चौगुले शहीद

Jawan Mahesh Ramchandra Chaugule of Shahuwadi taluka was martyred


By nisha patil - 12/1/2024 11:50:22 AM
Share This News:



शाहुवाडी तालुक्यातील जवान महेश रामचंद्र चौगुले शहीद

 आंबर्डे गावावर शोककळा

 मनमिळावू स्वभावाचे महेश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

शाहुवाडी - "शाहुवाडी तालुक्यातील आबर्डे या गावातील जवान महेश रामचंद्र चौगुले वय 31 हे राजस्थान येथील अलवर शहरात सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. महेश चौगुले जवानाच्या मृत्युने आबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.त्यांनी सैन्य दलात गेली बारा वर्षे देशाची सेवा केली आहे.त्यांच्या युनिटमध्ये त्यांचे उल्लेखनीय काम होते.सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत व त्यांच्या सहकार्य सोबत त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते.मनमिळावी व्यक्तिमत्व व अधिकाऱ्यांचे मन राखणारे व्यक्तिमत्व होते.8 जानेवारी 2024 रोजी राजस्थान येथील अलवर या शहरात कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा – मुलगी, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे.आबर्डे गावामध्ये त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे."


शाहुवाडी तालुक्यातील जवान महेश रामचंद्र चौगुले शहीद