बातम्या

जवान’चं नवं गाणं झालं रिलीज

Jawans new song has been released


By nisha patil - 8/29/2023 7:48:51 PM
Share This News:



 शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्यामधील‘नॉट रमैया वस्तावैया’  हे नवे गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये शारुख खान आणि नयनताराचा दमदार डान्स दिसून येत आहे. या गाण्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. शाहरूख खान हा सध्या त्याच्या ‘जवान‘ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून मीडिया आणि इव्हेंट्स द्वारे प्रमोशन न करताही सोशल मीडियावर शाहरूख खान आणि त्याचा जवान चित्रपट बराच चर्चेत आहे. जवानचं दुसरं गाणं ‘नॉट रमैया वस्तावैया’ रिलीज करण्यात आले असून ते फुल धमाल, पार्टी साँग आहे. या गाण्यातील शाहरूखची एनर्जी पाहून तरूण कलाकारही उत्साही होतील ‘नॉट रमैया वस्तावैया’ या गाण्यात शाहरूख फुल मस्ती आणि डान्स करताना दिसत आहे.


जवान’चं नवं गाणं झालं रिलीज