बातम्या
कुंभमेळ्यावर जया बच्चन यांचे वादग्रस्त वक्तव्य..
By nisha patil - 4/2/2025 1:51:33 PM
Share This News:
संसदेच्या परिसरात मीडियाशी बोलताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभमेळ्यातील पाण्याबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, कुंभमेळ्यातील गंगाजल सर्वात प्रदूषित असून, मृतदेह फेकल्याने त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, जया बच्चन यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. "वास्तविक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मृतदेह थेट गंगेत फेकले गेले, आणि त्याच पाण्याचा वापर लोक करत आहेत," असे त्यांनी म्हटले.
जया बच्चन यांच्या या विधानावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय असताना, असे वक्तव्य करून त्यांनी धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप काही मंडळींनी केला आहे. त्यांच्या विधानावर भाजप आणि हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कुंभमेळ्यावर जया बच्चन यांचे वादग्रस्त वक्तव्य..
|