बातम्या

जयकल्प फाउंडेशनतर्फे रंगला दिव्यांगांचा फॅशन शो

Jayakalpaund Foundation Rangala Fashion Show for Handicapped


By nisha patil - 3/3/2024 1:05:18 PM
Share This News:



जयकल्प फाउंडेशनतर्फे रंगला दिव्यांगांचा फॅशन शो

जयकल्प च्या तरुणींनी समाजभान जपले- खा.धैर्यशील माने

प्रतिनिधी पांडुरंग फीरींगे कोल्हापूर: ब्लुम फाउंडेशन जयकल्प फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन केले होते. दिव्यांग मुलांना फॅशन शोमध्ये सामावून घेण्याची संकल्पनाच दिव्यांगांना आनंद आणि प्रोत्साहन देणारी ठरली. या शोसाठी कोल्हापुरातील ब्लुम फाउंडेशन संचलित जयकल्प फाउंडेशनने पुढाकार घेतला. कोल्हापूर ना रंगाची, ना स्पर्शाची जाणीव

■ना रंगाची जाणीव, ना स्पर्शाची, कोण अंध, कोण मूकबधिर, तर कोण कर्णबधिर, असे दिव्यांग या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. शोमध्ये सादरीकरण करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. येथील बालाजी गार्डन येथे हा फॅशन शो झाला. दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर आपल्यातील क्षमता दाखवून देणारा एक भाग आहे.


संस्थापिका श्रद्धा राठोड-शहा, सुजाता कोरडे, शलाका शहा, प्रार्थना शहा, त्यावर मात केली, तर जगणे सुखावह होते हे सांगण्याचा प्रयत्न या फॅशन शोमधून केलेला आहे. सदर १३ तरुणींनी करत असलेले काम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सांगितले.


व्यंग ही माणसाची कमजोरी किरण कलाणी भूमिका सचदेव, मोनिका जसुजा यांचे सहकार्य मिळाले. यावेळी खासदार धैर्यशील माने,आयुक्त के.मंजु लक्ष्मी, मधूमिराजे छत्रपती, ऋतुराज क्षीरसागर, वेदीका माने,आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.विविध मान्यवर यांचा झाडं देऊन सत्कार करण्यात आला.


जयकल्प फाउंडेशनतर्फे रंगला दिव्यांगांचा फॅशन शो