बातम्या
फक्त 15 रुपयात भूक भागवते कोल्हापूरातील झुणका भाकर केंद्र
By nisha patil - 3/8/2023 6:24:57 PM
Share This News:
वारणेला शिकत असलेल्या धाकट्या मूलाने पंधरा रुपयचा वडापाव खाऊन दिवस काढले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून त्याला नोकरीही लागली. शिक्षण घेताना आपल्याला बसलेल्या संघर्षाच्या झळा इतरांना बसू नये यासाठी अवघ्या पंधरा रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करण्याचा मानस या मुलाने आईकडे व्यक्त केला आणि आईनेही त्याला सहमती दिली आणि गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापुरातील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील 'आई झुणका भाकर केंद्र' सुरु केल आणि आता फक्त 15 रुपयात अनेकांची भूक हे आई झुणका भाकर केंद्र भागवत आहेत
पारंपरिक पद्धतीच्या झुणका भाकरसाठी खवय्ये आजही कोल्हापुरातील गल्ल्या नी गल्ल्या पालथ्या घालत आहेत. हौशी खवय्यांचा शोध शाहूपुरीतील आई झुणaका भाकर केंद्र येथे संपतो, या ठिकाणी हे देवाई कुटुंब खवय्यांना परवडणाऱ्या दरात झुणका भाकर उपलब्ध करून देत आहेत, त्यांच्या या कार्याला कोल्हापुरातील खवय्यांची ही चांगली पसंती मिळत आहे.
गगनाला भिडलेल्या महागाईचा चटका पोटाला बसू नये यासाठी विद्यार्थ्यांपासून अगदी उच्च पदावर कार्यरत असलेले नोकरदारही संगीता देवाई यांच्या हातची झुणका भाकर खाण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत.
फक्त 15 रुपयात भूक भागवते कोल्हापूरातील झुणका भाकर केंद्र
|