बातम्या

शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली घणाघाती टीका

Jitendra Awad criticized Hasan Mushrif in Sharad Pawars meeting


By nisha patil - 11/9/2023 6:01:20 PM
Share This News:



   कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा झाल्यानंतर आज अजित पवार गटाकडून उत्तर सभा होत आहे. शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी कोल्हापुरी पायताणाचा वापर करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आव्हाडांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला होता. त्याचाच संदर्भ देत मुंडे यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की शरद पवार साहेबांची सभा झाली आणि लोक आम्हाला विचारू लागले उत्तर देण्यासाठी तुमची सभा होणार का? आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार आहे. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरीक कधी सहन करणार नाहीत. ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात. बीड आणि कोल्हापूरचं आगळ वेगळं नात आहे. तुम्ही ऊस पिकवणारे आणि आम्ही ऊस तोडणारे आहोत, असे मुंडे म्हणाले.


शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली घणाघाती टीका