बातम्या

भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन

Jode Maro movement on behalf of Bharatiya Janata Party


By nisha patil - 10/21/2023 4:05:33 PM
Share This News:



भाजपाच्या वरीष्ठ नेत्याना बदनाम करणेचा प्रयत्न विरोधी आघाडीचे नेते व खासकरुन शरद पवार व उद्धाव ठाकरे व कॉंग्रेस करत आहे त्याचा कडाडुन विरोध करण्यासाठी आज शनिवारी सकाळी १० वाजता वाघबीळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 देवेंद्र फडणीसांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे व शरद पवारांवर अनेक आरोप प्रत्याआरोप केले यातच  कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडीचा असून, आमच्या सरकारवर हे पाप टाकले जातेय असा हल्लाबोल ही यावेळी त्यांनी  केला . या विधानानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी  विरोधी कार्यकर्त्यांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निषेध  केला जातोय. तर अनेक तरुण आक्रमक  झालेले दिसून येत आहे.  यातच  पन्हाळयातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक   झाले आहेत. भाजपाच्या वरीष्ठ नेत्याना बदनाम करणेचा प्रयत्न विरोधी आघाडीचे नेते व खासकरुन शरद पवार व उद्धाव ठाकरे  करत आहे. त्याचा कडाडुन विरोध करण्यासाठी  शनिवारी सकाळी १० वाजता पन्हाळातील वाघबीळ येथे  त्यांच्याकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले आहे. अशी जोरदार घोषणाबाजी ही यावेळी त्यांनी  केली .
     यावेळी शाहुवाडी विधानसभेचे प्रमुख श्री प्रवीण प्रभावळकर, पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, शाहुवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग वर्गे आबा, जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिपुगडे, यांचे सह तालुक्यातील जेष्ठ नेते तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..


भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन