बातम्या

कामगार मंत्र्यांच्या घरावरील ११ सप्टेंबर च्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा... कॉ. शिवाजी मगदूम

Join the 11th September March at Labor Ministers House in large numbers


By nisha patil - 2/9/2023 7:34:48 PM
Share This News:



कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरीता बांधकाम कामगारांनी ११ सप्टेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने भागीदारी करावी असे आवाहन लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव काॅ शिवाजी मगदूम यांनी केले ते सिद्धनेर्ली येथे आयोजित केलेल्या, कागल व करविर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या सुरवातीला सिद्धनेर्ली शाखेचे अध्यक्ष कॉ हेमंत कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
         

कॉ. शिवाजी मगदूम पुढे म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर आल्यानतंर त्यांनी सन २०१५ ला बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना बंद करून कामगारांच्या विरोधातील खरा चेहरा दाखवुन दिला आहे . आज बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे घोटाळ्यावर घोटाळे बाहेर पडत आहेत, त्यामध्ये सुरक्षासंच घोटाळा, मध्यान्ह भोजन घोटाळा, आरोग्य तपासणी घोटाळा, आणि नुकताच बाहेर आलेला कपाट घोटाळा, त्यामुळे मंडळ सातत्याने चर्चेत आहे. यासंबंधी कामगार मंत्र्यांना जाब विचारलाच पाहीजे असे मत व्यक्त केले. 
 कॉ शिवाजी मगदूम पुढे म्हणाले, संघटनेने आजपर्यंत संघर्ष, चळवळी करून मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले, पुर्वीच्या सरकारणे सुरू केलेल्या कांही योजना बंद करून सरकार बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्कापासुन अलीप्त ठेवण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे या सरकार विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन केले. 
       

यावेळी बोलताना कॉ विक्रम खतकर म्हणाले, मंडळाकडे जमा असलेल्या निधीतुन कामगारांना मेडीक्लेम योजना, घरकुल योजना, उच्च शिक्षणासाठीचे लाभ, ६० वर्षावरील नोंदीत बांधकाम कामगारांना पेन्शन योजना यासारख्या महत्वपूर्ण योजना तात्काळ द्याव्यात अशी मागणी केली. 
यावेळी बोलताना करविरचे अध्यक्ष कॉ आनंदा कराडे म्हणाले ११ सप्टेंबरच्या मोर्चाने सरकारला व मंत्र्यांना धडकी बसेल इतकी भागीदारी करावी.असे आवाहन केले. 
यावेळी बोलताना कॉ मोहन गिरी म्हणाले, मंडळाकडुन कामगारांना लाभ देण्यासाठी मंडळ दिरंगाई करीत आहे, कामगारांना शैक्षणिक योजनांचा लाभ मुलाचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मिळत आहे. त्यामुळे मंडळाने योजनांचा अर्ज भरल्यानंतर ७ दिवसाच्या आत अर्ज तपासणी करून कामगारांच्या खात्यावर रक्कम अदा करावी अशी मागणी केली. 
         

यावेळी, आर के पेंटर, दिनकर जाधव,विनायक सुतार, रमेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कॉ राजाराम आरडे यांनी केले. व शेवटी आभार कॉ संतोष राठोड यांनी मानले. 
         

यावेळी पांडुरंग मोरबाळे, मारूती कांबळे, जोतिराम मोंगणे, शिवाजी लोहार, शिवाजी सुतार,गणपती सुतार, राजाराम पाटील,सुजाता वास्कर, वनिता लाड, हारून मानगावे, जयसिंग कांबळे, सुनिल नुल्ले, सुभाष पाटील,रंगराव जाधव,यलाप्पा पाटील, सर्जेराव कांबळे, गोविंद वडर, अनिकेत कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


कामगार मंत्र्यांच्या घरावरील ११ सप्टेंबर च्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा... कॉ. शिवाजी मगदूम