बातम्या

कागलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जल्लोषी स्वागत मिरवणूक

Jubilant welcome procession of statue of Chhatrapati Sambhaji Maharaj in Kagal


By nisha patil - 1/17/2024 7:19:29 PM
Share This News:



कागलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जल्लोषी स्वागत मिरवणूक 
         
सकल मराठा समाजाचे आयोजन
              
पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू साखरचे संचालक बॉबी माने, सदासाखरचे संचालक महेश घाटगे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन

               
कागल, कागलमध्ये निपाणी वेस येथे प्रतिष्ठापना करावयाच्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वागत मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या मिरवणुकीआधी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा;  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू साखरचे संचालक बॉबी माने, सदासाखरचे संचालक महेश घाटगे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने निपाणी वेशी मध्ये बांधकाम केलेल्या चबुतऱ्यावर या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त मंत्री श्री. मुश्रीफ, श्री. घाटगे, श्री.  माने व श्री. घाटगे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.
             
मिरवणुकीच्या पुढे झांजपथक, मर्दानी खेळ, हलगी पथक, धनगरी ढोल पथक, दाक्षिणात्य ढोल पथक आदींचा समावेश होता. बस स्टॅन्ड, बॅरिस्टर खर्डेकर चौक, पोलीस स्टेशन, गैबी चौक मार्गे निपाणी वेस येथे या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीवर ठीकठिकाणी गॅलरी आणि स्वागत कमानींवरून फुलांचा वर्षाव होत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.
               
मुस्लिम समाजातर्फे पुतळ्याला पुष्पहार.......!
या अकरा फुट उंची असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याची स्वागत मिरवणूक गैबी चौकात येताच कागल शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने पुतळ्याला मोठा पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" व "छत्रपती संभाजी महाराज की जय" या घोषणांनी परिसर दणाणून गेला.  
      
यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागलनगरी  मानवता आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वच राजकीय पक्षांसह सर्वच जाती-धर्मीयांना व विविध संघटनांना एकत्रित घेऊन प्रतिष्ठापना होत असलेला स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.
    
यावेळी नितीन दिंडे, नितीन काळबर, नाना बरकाळे, प्रकाश जाधव, सचिन मोकाशी,शशिकांत भालबर, दीपक मगर, सतीश पोवार, महेश मगर, राहुल चौगुले, राहुल माने,संजय ठाणेकर, संजय चितारी, अमन आवटे, शुभम घाडगे, दिग्विजय डुबल, प्रशांत म्हातुगडे, मेघराज वाघमारे, प्रताप उर्फ भैयासाहेब माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, नवल बोते, तात्या पाटील, अस्लम मुजावर, सौरभ पाटील, सुनील माने, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, महेश घाटगे, ईगल प्रभावळकर, सर्जेराव चव्हाण, बॉबी माने, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, रणजीत पाटील, दिलीप घाटगे, आप्पासाहेब हूच्चे, रमेश माळी, राम रेवडे, बंडा वाळवेकर, सचिन मोकाशी, किसन मोरे आधी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कागलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जल्लोषी स्वागत मिरवणूक