बातम्या

बॉलिवूडमध्ये जल्लोष :भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय

Jubilation in Bollywood


By nisha patil - 10/6/2024 10:16:28 PM
Share This News:



ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात  सलग दुसरा विजय साजरा केला. भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून धर्म आहे. प्रत्येक सामन्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता असते. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने  पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवण्याने सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील टीम इंडियाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत. 
 

वरुण धवनने इंस्टा स्टोरीवर सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे,"क्या मॅच, क्या प्रदर्शन, टीम इंडिया! जय हिन्द!".


बॉलिवूडमध्ये जल्लोष :भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय