बातम्या

चौगुले महाविद्यालयाच्या दोघांनी ज्युदोत सुवर्ण

Judo gold by two from Chaugule College


By Administrator - 10/1/2024 1:23:22 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयाच्या दोघांनी ज्युदोत सुवर्ण

कोतोली - शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय ज्यूदो स्पर्धेमध्ये श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील बी.एस्सी.भाग - १ ची विद्यार्थिनी साक्षी सुभाष मगदूम हिने ४८ किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले तर वैष्णवी शिवाजी पाटील हिने ५२ किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले. या विद्यार्थिनींची निवड बनस्थळी विद्यापीठ,राजस्थान या ठिकाणी होणाऱ्या साऊथ वेस्ट झोन ज्यूदो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये झाली आहे.

यासाठी त्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संग्रामसिंह मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.


चौगुले महाविद्यालयाच्या दोघांनी ज्युदोत सुवर्ण