बातम्या

वर्षभर जुगलबंदी आता मात्र एकत्र; चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Juggling for a year now but together


By nisha patil - 4/7/2023 4:49:50 PM
Share This News:



वर्षभर जुगलबंदी आता मात्र एकत्र; चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तारा न्यूज वेब टीम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सत्तानाट्याची मागील दोन दिवस राज्यात चांगलीच चर्चा रंगली. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. अनेकांनी या सत्तानाट्यावर टीका केली मात्र यातच भाजप नेत्या चित्रा वाघ  आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपली चाकणकर  यांचा एक फोटो सध्या सोशल  मीडियावर व्हायरल होत आहे.  प्रत्यारोप करणाऱ्या दोन नेत्या आता एकाच सरकारमध्ये आल्या आहेत. त्यामुळे यापुढे दोघींची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांचा एक फोटो नेटकऱ्यांनी व्हायरल केला आहे. मागील वर्षभर अनेक मुद्द्यांवर या दोघींनी एकमेकींवर अनेकदा आरोप केले. उर्फी जावेद प्रकरणातदेखील दोघी एकमेकांवर सोशल मीडियावर टीका करताना दिसल्या. दोघीची चांगल्या मैत्रीणी असलेल्या दोन वेगळ्या पक्षाची भूमिका मांडत असताना अनेकदा विरोधात गेल्या मात्र यावेळी अजित पवारच भाजप सरकरसोबतच सरकारमध्ये सामील झाल्याने या दोघींचा फोटो व्हायरल केला जात आहे.
हा फोटो आत्ताचा नसून 2018 मध्ये रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकला शेअर केला होता. त्यावेळी 'आज लग्नानिमित्त आमच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय चिञाताई यांची भेट झाली.प्रसंग कोणताही असो ,पण भेटीचा उत्साह हा नेहमीच ओसंडून वाहत असतो.मनाला प्रेरणादायी तर असतो पण प्रत्येक भेटीत नात्याची वीण घट्ट होऊन जाते', असं कॅप्शन दिलं होतं. त्यावेळी चित्रा वाघ राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली होती. 

चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांनी मागील वर्षभर अनेक मुद्दांवरुन एकमेकांवर टीका केली. सुरुवातील एकमेकींच्या साथी, मैत्रिणी असलेल्या दोघी पक्ष बदलल्यामुळे विरोधक झाल्या. मुलींबाबतील असणाऱ्या प्रत्येक मुद्यांवरुन एकमेकींवर आरोप केले. रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या कामकाजावर चित्रा वाघ यांनी अनेकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.  रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघींनी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. रुपाली चाकणकर यांची सोमवारी  प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.


वर्षभर जुगलबंदी आता मात्र एकत्र; चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल