बातम्या

जीवनात फक्त 5 हे बदल करा आणि तणावाला तुमच्यापासून दूर ठेवा

Just make these 5 life changes and keep stress away from you


By nisha patil - 2/12/2023 7:36:15 AM
Share This News:



आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना शांततेत काही वेळ घालवायलाही वेळ मिळत नाही. ज्यामुळे पुढे जाऊन लोकांमध्ये तणाव इतका वाढतो की, त्याचा खोलवर परिणाम होतो.

दिवसभर कामात व्यस्त राहणे आणि गोष्टींचा जास्त विचार करणे या सगळ्यात लोकांना गुंतवून ठेवते. चिंता, नैराश्य आणि इतर अनेक आजार आजकाल सामान्य झाले आहेत. पण प्रत्येकाने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून स्वतःकडे लक्ष दिले तर चिंता, नैराश्य यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. यासाठी आपल्याला आपल्या व्यस्त वेळापत्रकात काही बदल करावे लागतील.

१. निरोगी आहार

आपण जे खातो त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे असेच पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. त्यामुळे वजन वाढणार नाही. फळे, भाज्या, धान्य, प्रथिने आणि चांगले फॅट असलेल्या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करा.

२. योग आणि ध्यान

आपण जर योग आणि ध्यान यांना आपल्या जीवनात स्थान दिले तर तुम्ही अनेक आजारांवर मात करु शकता. अनेक आजार तुमच्या जवळ देखील येणार नाहीत. ध्यान केल्याने मनाला शांती आणि जीवनात स्थिरता मिळते. मन शांत राहते.

३. लेखन करणे

डायरी लिहिणे आधी अनेकांना याची सवय होती. पण आता आपले विचार आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टी लिहण्यासाठी देखील अनेकांना वेळ मिळत नाही. असं करु नका. चिंता आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जर्नलिंगचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रोज लिहिण्याची सवय लावा.

४. पुरेशी झोप घेणे

वेळेवर झोपणे आणि योग्य झोप घेणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. रात्री नेहमी वेळेवर झोपा आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. जे लोक कमी झोपतात त्यांना तणावच नाही तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील येतात.

५. सकाळी लवकर उठा

नेहमी लवकर उठण्याचा सल्ला आधीपासून दिला जात आहे. कारण याचे अनेक फायदे आहेत. आपण योग आणि ध्यान करण्यासाठी वेळ काढू शकतात. लवकर उठून आपण आपला वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो.


जीवनात फक्त 5 हे बदल करा आणि तणावाला तुमच्यापासून दूर ठेवा