बातम्या

के. एम.टी बस चा आज लोकार्पण सोहळा

K M Ts launch today


By nisha patil - 9/18/2023 9:26:28 AM
Share This News:



 के. एम.टी बस चा  आज  लोकार्पण  सोहळा

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2022-23 मधून आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांचे स्थानिक विकास निधीमधून 03 याप्रमाणे 09 डिझेल वातानुकुलीत बसेस कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. सदर 09 डिझेल वातानुकुलीत बसेस प्रवासी वाहतुकीसाठी मार्गस्थ करणेचा लोकार्पण समारंभ आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे हस्ते व प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका यांचे प्रमुख उपस्थितीत आज दि.18 सप्टेंबर रोजी दसरा चौक मैदान येथे सायं.4.00 वा. होणार आहे.   या कार्यक्रमास महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, माजी पदाधिकारी, महानगरपालिका व के.एम.टी. कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत.


के. एम . टी बस चा आज लोकार्पण सोहळा