बातम्या

केसीआर विठ्ठलाच्या चरणी लीन..!

KCR falls at the feet of Vitthal


By nisha patil - 6/27/2023 12:47:42 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  पंढरपूर :  आषाढी वारीचे औचित्य साधून भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  सध्या पंढरपूरमध्ये असून तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के.सी. राव सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. दरम्यान, विठ्ठल मंदिरात जात केसीआर यांनी दर्शन घेतलं. तर रूक्मिणी मातेचंही त्यांनी दर्शन घेतलं आहे.
यावेळी 10 दहा तेलंगणाचे मंत्री त्यांच्यासोबत होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. केसीआर यांच्यासोबत सहाशे गाड्यांचा ताफा होता. मात्र हा ताफा पंढरपूरबाहेरच अडवण्यात आला.

दरम्यान, के. चंद्रशेखर राव हे सोमवारी दुपारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि खासदारांसह हैद्राबादच्या प्रगती भवनातून सोलापूरला निघाले. वाटेत त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. सायंकाळी के चंद्रशेखर राव आणि त्यांचा ताफा सोलापुरात पोहोचला.
या सर्वांसाठी सोलापुरात मुक्कामासाठी विविध हॉटेल्समध्ये 225 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातील मुक्कामानंतर मंगळवारी चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरला रवाना झाले.

मिळलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मंदिरात पूजा आणि दर्शन केल्यानंतर केसीआर हे पंढरपूर तालुक्‍यातील सरकोली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या सरकोली या गावात जाणार असून या ठिकाणी भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश झाल्यानंतर चंद्रशेखर राव शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंढरपूर येथून निघाल्यानंतर केसीआर हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेणार आहेत.
विमानातून पुष्पृवृष्टी नाकारलीश्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वाखरी येथे होणाऱ्या पालखी सोहळ्यावर विमानातून पुष्पुष्टी करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून सोलापूर विमानतळावर केसीआर यांचे विमान येऊन थांबले आहे. परंतु प्रशासनाने विमानातून पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आणि बीआरएस पक्षात प्रवेश करणारे भगीरथ भालके यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


केसीआर विठ्ठलाच्या चरणी लीन..!