बातम्या
माझ्या माय माऊलींनी कागलच्या परिवर्तनाची वज्रमुठ बांधल्याने विजय निश्चित : सौ नवोदिता घाटगे
By nisha patil - 10/29/2024 9:35:49 PM
Share This News:
माझ्या माय माऊलींनी कागलच्या परिवर्तनाची वज्रमुठ बांधल्याने विजय निश्चित : सौ नवोदिता घाटगे
माझ्या सर्वसामांन्य माय माऊलींनी या विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाची वज्रमुठ बांधली आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या माझ्या माता भगिनींना समरजितसिंह घाटगे यांच्या शाश्वत विकासाचे व्हिजन समजले आहे. असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.म्हाकवे (ता.कागल) येथे परिवर्तन संकल्प दौऱ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच कविता पाटील होत्या.
यावेळी नवोदिता घाटगे म्हणाल्या," जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य सुविधा पुरविल्या. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही या पेक्षा अधिक जमाने सेवा करण्याची संधी देण्यासाठी तुम्ही सर्वांनी ताकतीने समरजितराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी या निवडणुकीत समरजीतसिंह घाटगे यांना विजयी करावे.
गेली आठ वर्षे आम्ही राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांसाठी काम करत आहोत. महिलांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी प्रयत्न करत आहोत. पुढेही हे कार्य जोमाने करण्यासाठी परिवर्तन करुन समरजितराजेंना आमदार करुया."
स्वागत व प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले. यावेळी शाहू साखरचे माजी संचालक श्री.पी.डी. चौगुले, धनाजी पाटील,उपसरपंच रणजित लोहार,ग्रामपंचायत सदस्या आशाताई कांबळे श्री ए.डी. पाटील, रघुनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस रवी पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, संदीप कांबळे, दिपक कांबळे, दत्ता कांबळे, अजित पाटील, उत्तम चौगुले यांचेसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार भारत चौगुले यांनी मानले.
यावेळी शंकरवाडी,वंदूर, करनुर, रणदेवाडी येथे परिवर्तन संकल्प बैठकीस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिवर्तनाचे तोरण घरोघरी बांधूया....
गेल्या पंचवीस वर्षात पालकमंत्र्यांनी तरुणांना व्यसनाधीन केले. त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली. हाच कागल तालुक्यात विकास झाला आहे. तरुणांना योग्य दिशा देण्याऐवजी त्यांची दुर्दशा करण्याचे काम पालकमंत्र्यांनी जाणिवपूर्वक केले गेले आहे. स्वच्छ चारित्र्य, कर्तुत्वान, आभ्यासू तसेच सामाजिक कार्याचे, शाश्वत विकासाचे व्हिजन असणाऱ्या राजे समरजितसिंह घाटगे यांना या निवडणुकीत विजय करून परिवर्तनाचे तोरण घरोघरी बांधूया... असे प्रतिपादन सरपंच कविता पाटील यांनी केले.
माझ्या माय माऊलींनी कागलच्या परिवर्तनाची वज्रमुठ बांधल्याने विजय निश्चित : सौ नवोदिता घाटगे
|