बातम्या

कागलच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये संगणकीकृत अभ्यासिका तयार करू

Kagals Dr We will prepare computerized textbooks in Babasaheb Ambedkar Nagar


By nisha patil - 8/18/2023 6:17:08 PM
Share This News:



कागलच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये संगणकीकृत अभ्यासिका तयार करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत आंबेडकर नगरवासीयांचा सिंहाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले.
                
विकासकामांसह नागरिकांना धान्यवाटप अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. तसेच; नवीन हायमस्ट व नागरिकांना धान्यवाटपही मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
          
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये असलेले जुने बुद्धविहार जीर्ण झालेले असून मोडकळीस आलेले आहे. या जागेच्या मालकी संदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर या जागेवर सुंदर असे बौद्धविहार बांधकाम करू.
           
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ दलित, उपेक्षित, आणि वंचित समाजाच्या पाठीशी नेहमीच पहाडासारखे उभे राहिले आहेत.  
          
माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दलित समाजासाठी रमाई आवास योजना प्रभावीपणे राबवली आणि आम्हा मागासवर्गीयांचे राहणीमान उंचावले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, नगरसेवक विवेक लोटे, तुषार भास्कर, सुरजकुमार कामत, बच्चन कांबळे आदी प्रमुखांची भाषणे झाली.
            
व्यासपीठावर जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, तात्यासाहेब पाटील, केडीसीसी बँकेची संचालक भैय्या प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, भगवान कांबळे, गणेश कांबळे, राहुल कांबळे, दीपक कांबळे, नेताजी कांबळे, नवाज मुश्रीफ, संजय ठाणेकर, अस्लम मुजावर, ॲड. संग्राम गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.


कागलच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये संगणकीकृत अभ्यासिका तयार करू