बातम्या

कै. प्रसाद केरकर प्रतिष्ठानतर्फे बुद्धीबळ स्पर्धा संपन्न

Kai Chess tournament concluded by Prasad Kerkar Foundation


By nisha patil - 7/15/2024 7:01:59 PM
Share This News:



कोल्हापूर : कै. प्रसाद केरकर प्रतिष्ठान च्या वतीने दैवेज्ञ बोर्डिंग वनिता हॉल येथे बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 16 वर्षाखालील 44 मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे  पारितोषिक वितरण समारंभ माहिती अधिकारी वृषाली पाटील, आयुर्वेद भारतीच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी माळकर, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या योगशिक्षिका अनिता पेडणेकर, मॉडर्न शिक्षण संस्था सेक्रेटरी डॉ. सायली कचरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आदर्श गृहिणी मनिषा दीपक पाटील यांना जीवनज्योंती पुरस्काराने गौरविण्यात आले.
 

बुद्धीबळ स्पर्धा सकाळी 11 वाजता सुर झाल्या. एकूण 44 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये 14 वर्षाखालील गटात नियती चोडणकर प्रथम तर विराज कुंभार द्वितीय क्रमांकाने विजयी झाले. 12 वर्षाखालील गटात आर्या चोडणकर हिने  प्रथम तर राणी कोळी हिने द्वितीय  क्रमांक पटकावला. 10 वर्षाखालील गटात समित नेर्वेकर प्रथम तर श्रीतेज भट याने द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष कामगिरी केलेल्या मुलींमध्ये अर्पिता पवार प्रथम तर खुल्या गटात सनेहल गावडे याने अजिंक्यपद पटकावले.
स्वागत प्रस्ताविक मालोजी केरकर यांनी केले. आभार संजय गायकवाड यांनी मानले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक मालेजी केरकर, माधव देवस्थळी, सचिव सूर्यकांत चोडणकर, उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्यासह विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.


कै. प्रसाद केरकर प्रतिष्ठानतर्फे बुद्धीबळ स्पर्धा संपन्न