बातम्या

कै. नेमिनाथ वाळवेकर चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

Kai Inauguration of Neminath Valvekar Cup Open Chess Tournament


By nisha patil - 1/27/2025 1:53:17 PM
Share This News:



कै. नेमिनाथ वाळवेकर चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन

रेंदाळ येथे कॅसल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

रेंदाळ, ता. हातकणंगले येथे कॅसल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने कै. नेमिनाथ वाळवेकर (आबा) चषक भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन पाटील, शशिकांत खोत, भिषेक पाटील, सुहास जाधव, प्रकाश मुधाळे, रोहित मिरजे हे उपस्थित होते. तसेच, स्पर्धा संयोजक सूर्याजी भोसले आणि रेखा कोळी यांसह अनेक कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन बुद्धिबळ क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारे ठरले असून, गावातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


कै. नेमिनाथ वाळवेकर चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
Total Views: 62