मनोरंजन

नुकताच काजोलनं घेतला मोठा निर्णय     

Kajol recently took a big decision


By surekha - 9/6/2023 5:54:00 PM
Share This News:



नुकताच काजोलनं घेतला मोठा निर्णय                                                                                                                                    सोशल मीडिया या माध्यमाचा वापर अनेक लोक जगासमोर व्यक्त होण्यासाठी करतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या चाहत्यांच्या समोर मांडत असतात. अशातच आता अभिनेत्री काजोलनं  सोशल मीडिया संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. काजोल ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. काजोलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.' या पोस्टला काजोलनं कॅप्शन दिलं, मी सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. 
काजोलनं  इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. काजोलनं सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला आहे? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. 
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
काजोलनं शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'मला माहित नाही की असे काय झाले ज्यामुळे तू हा निर्णय घेतला, आम्ही तुझे चाहते आहोत आणि तुझ्या चाहत्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे आम्ही तुला शुभेच्छा देतो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'काळजी घे'


Kajol recently took a big decision