बातम्या

कळसुबाई शिखराला अन्वीची दुसऱ्यांदा गवसणी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

Kalsubai peak is the second highest peak in Maharashtra


By nisha patil - 5/7/2023 5:01:41 PM
Share This News:



कळसुबाई शिखराला अन्वीची दुसऱ्यांदा गवसणी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

शिखर असलेले कळसुबाई शिखराला (समुद्र सपाटीपासून उंची १६४६ मीटर) कोल्हापूरची कन्या अन्वी चेतन घाटगे (वय ३ वर्षे ११ महिने) हिने दुसऱ्यांदा गवसणी घातली आहे.

नेज (ता. हातकणंगले) येथील चिमुरड्या अन्वीने वय २ वर्षे ११ महिने असताना कळसुबाई शिखर गतवर्षी सर केले होते. तिच्या या कामगिरीची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्ये होऊन तिला 'यंगेस्ट माऊंटेनियर' हा किताब देण्यात आला होता. दि. १ जुलै रोजी अन्वीने तिची आई अनिता, वडील चेतन आणि प्रा. अनिल मगर यांच्यासह पुन्हा चार तासांत कळसुबाई शिखर सर केले. मुसळधार पाऊस, दाट धुके, प्रचंड वेगाने वाहणारा वारा यांच्याशी सामना करत शिखर गाठले. दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड (समुद्रसपाटीपासून उंची ४३०० फूट) हा चढाईस अत्यंत कठीण किल्लाही प्रतिकूल परिस्थितीत सर केला. याबद्दल नेचर हंट अॅडव्हेंचर संस्थेचे अध्यक्ष रवी झाडे यांच्या हस्ते अन्वीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मे महिन्यात अन्वीने कोकणातील १० गड-किल्ले तीन दिवसांत सर केले आहेत. आतापर्यंत दक्षिण भारतातील ७ किल्ल्यांसह महाराष्ट्रातील ३८ किल्ले तिने सर केले आहेत.


कळसुबाई शिखराला अन्वीची दुसऱ्यांदा गवसणी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर