प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन

Kamal Haasans entry in Prabhas Project K 150 crores taken as remuneration


By nisha patil - 5/31/2023 6:30:21 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन  आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजवर त्यांनी बॉलिवूडसह अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. नुकतचं 'आयफा 2023'मध्ये  त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्य आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमात कमल हासनची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. 
प्रोजेक्ट के' या सिनेमात कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी त्यांनी तब्बल 150 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी 20 दिवस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 20 दिवसांत कमल हासन यांनी 150 कोटींची कमाई केली आहे. 'बिग बॉस तामिळ 7'च्या शूटिंगआधी कमल हासन यांनी 'प्रोजेक्ट के'चं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 
कमल हासन यांचा 'विक्रम' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. या सिनेमातील कमल हासनच्या अभिनयाचंदेखील चाहत्यांनी कौतुक केलं.


प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन