बातम्या

बॉक्स ऑफिसवर आपटलेला कंगना रनौतचा 'तेजस

Kangana Ranauts Tejas hit the box office


By nisha patil - 12/26/2023 4:54:45 PM
Share This News:



बॉक्स ऑफिसवर आपटलेला कंगना रनौतचा 'तेजस

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा   'तेजस' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 'तेजस' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासून चर्चेत होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता बॉक्स ऑफिसवर आपटलेला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.
 

कंगना रनौतसाठी 2023 हे वर्ष अनलकी ठरलं आहे. पंगाक्वीनचे बॅक टू बॅक अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. कंगनाचा 'तेजस' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तिच्या 'तेजस' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कंगनाला यश आलं नाही. अभिनेत्रीच्या फ्लॉप सिनेमांच्या यादीत आता तेजस सिनेमाचाही समावेश झाला आहे.
 
कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा अॅक्शन पॅक्ड सिनेमा आहे. या सिनेमाने कंगनाने वैमानिकेची भूमिका साकारली आहे. सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे तर रोनी स्क्रूवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'तेजस'ची ओटीटी रिलीज डेट आता समोर आली आहे. 5 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'तेजस' रिलीज झाल्यानंतर कंगनाने हा सिनेमा पाहण्याची चाहत्यांना विनंती केली होती. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली होती,"तेजस' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहिलेली मंडळी सिनेमाचं कौतुक करत आहे. कोरोनाकाळानंतर सिनेसृष्टी पुन्हा एकदा चांगले सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घरात सिनेमा पाहण्यापेक्षा सिनेमागृहात जाऊन संपूर्ण कुटुंबियांसोबत सिनेमा पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे".

कंगना रनौतचा 'तेजस'  हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. अभिनेत्री सध्या 'इमरजेन्सी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंगाक्वीन 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.  


बॉक्स ऑफिसवर आपटलेला कंगना रनौतचा 'तेजस