बातम्या

कंगनाची लगीनघाई! चाहत्यांना उत्सुकता,

Kangana s rus  Fans are curious


By nisha patil - 3/23/2024 4:46:18 PM
Share This News:



सध्या सर्वत्र लगीनसराई सुरु आहे. ऑनस्क्रिन लग्नाचा अभिनय करणारे कलाकार खऱ्या आयुष्यात त्यांचा आयुष्याचा जोडीदार निवडतायत. नुकतच आधी रकुल प्रती सिंग  आणि जॅकी भगनानी यांनी लग्नगाठ बांधली होती. पण आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंगना रनौत   हिने तिच्या लग्नाची तयारी सुरु केल्याचं समोर आलं आहे. 
कंगनाने तिच्या लग्नाचा पेहराव देखील निवडल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे  कंगनाने आपल्या लग्नाचा ड्रेस हा डिझायनरकडून तयार करुन घेणार असल्याची माहिती रेडिटकडून देण्यात आली. दरम्यान कंगनाचा हा ड्रेसचा डिझायनर इंडस्ट्रीमधीलच एक असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या तरी कंगनाने तिच्या लग्नाबाबतच्या गोष्टी या खासगी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरीही कंगनाने तिचा बॉयफ्रेंड आहे हे मात्र कबूल केलं होतं. 

 

कंगना रणौत लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याचदरम्यान कंगनाने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देखील हजेरी लावली होती. त्यावेळी कंगना आणि निशांत पिट्टीचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे त्या दोघांच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. पण त्यावर कंगनाने स्पष्टीकरण देत निशांत विवाहित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर कंगना एका परदेशी व्यक्तीसोबत हात हात धरुन चालताना देखील दिसली होती. त्यामुळे कंगना आता कोणसोबत लग्नगाठ बांधणार याची उत्सुकता सध्या तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. 


कंगनाची लगीनघाई! चाहत्यांना उत्सुकता,