बातम्या

करण जोहरने दिलेलं या प्रश्नाच्या उत्तराने केले सर्वांना हैराण

Karan Johars answer to this question surprised everyone


By nisha patil - 5/13/2024 6:32:09 PM
Share This News:



बॉलिवूडचा सिने-निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करण जोहर या व्हिडीओमध्ये सलमान खानला प्रश्न विचारताना दिसत आहे. करणने सलमानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफबद्दल एक प्रश्न विचारला आहे. करण जोहरने या प्रश्नाचं दिलेलं उत्तर सर्वांनाच हैरान करणारं आहे. 
 

करण जोहर आणि सलमान खानचा व्हिडीओ रेडिटवर समोर आला आहे. सलमान खानने करण जोहरचा रिअॅलिटी शो 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावलेली त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये करण सलमानला विचारतो की ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफमध्ये सर्वात जास्त सुंदर कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान खान पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतो. त्यानंतर कतरिना कैफला तो सुंदर म्हणतो. मजेशीर अंदाजात उत्तर देत सलमान म्हणतो,"पाहूयात आता यांच्या  नावापुढे कोणाचं नाव लागतंय".


करण जोहरने दिलेलं या प्रश्नाच्या उत्तराने केले सर्वांना हैराण