बातम्या
कर्ण हॉस्पिटल बनला कर्णबधीरांचा एकमेव आधार
By nisha patil - 10/17/2023 7:11:03 PM
Share This News:
कोल्हापुरातील कर्ण हॉस्पिटलने एका २ वर्षाच्या कर्णबधिर बालकावर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्या कर्णबधिर बालकाला नवीन आयुष्य दिले. या बालकाचे नाव फिरोज असून तो सातारा जिल्हात राहत आहे.
जोहान अत्तर यांच्या पालकांना त्याच्या वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच तो मोठ्या आवाजाने दचकत नाही किंवा मोठ्या आवाजाला काही प्रतिक्रिया देत नाही असे निर्देशनास आले म्हणून विविध ठिकाणी चाचण्या केल्यावर रुग्ण जनमताच कर्णबधीर असल्याचे निदान झाले कुटुंबीयातील वैद्यकीय इतिहास पाहता जोहानचे आजोबा देखील जन्मताच कर्णबधिर होते त्याप्रमाणे पालकाचे नात्यातच लग्न झाले होते. यामुळे त्याला कर्णबधिरपणा आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय.
भविष्यामध्ये जोहानला ऐकून न आल्याने बोलताही येणार नाही असे लक्षात आल्यावर पालकांनी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉक्लिअर इम्प्लांट करण्याची तयारी दर्शवली. कोल्हापूर येथील कान,नाक ,घसा तज्ञ डॉक्टर संदेश बागडे यांच्या सल्ल्याने कॉक्लिअर इम्प्लांटसाठी लागणारे विविध चाचण्या करून उजव्या कानासाठी इम्पॅक्ट करण्याचे जोहानच्या पालकांना सुनिश्चित केले
ही शस्त्रक्रिया डॉ.संदेश बागडी ,डॉ अक्षय वाचासुंदर ,डॉ अविनाश वाचासुंदर पुणे यांनी एकत्रितरित्या यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ञ डॉक्टर बाळासो खोत व असिस्टंट अमोल नावलीकर यांचेही सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रोपणाची चाचणी ऑडिओलॉजिस्ट शिल्पा हुजुरबाजार ,यश हुजुरबाजार ,भूषण बियाणी ,आणि कॉक्लिअर टीमने पार पाडली
कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने जन्मापासून कर्णबधिरता असलेल्या लहान मुलांमध्ये केली जाते त्यांना ऐकू येण्याची व वाचा विकसित होण्याची पुन्हा संधी मिळते तसेच ही शस्त्रक्रिया केवळ लहान मुलापर्यंतच मर्यादित न राहता वृद्धांमध्ये किंवा प्रौढ माणसांवर देखील केली जाऊ शकते.
जोहांची ही शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत अनुदानामध्ये पार पडली सामान्यतः ही शस्त्रक्रिया मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असते पण कर्ण हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खाजगी कान, घसा,नाकाचे हॉस्पिटल आहे. जे KBSK च्या अंतर्गत ही सेवा देते.
ही शस्त्रक्रिया आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने केली जाते. जर बाळ बोलत नसेल हाक मारल्यावर बघत नसेल तर आई-वडिलांनी बाळाची समस्या ओळखून तात्काळ उपचार करून घेणे गरजेचे आहे एक व्यक्तीला कॉलर इम्पॅक्ट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास पाच ते पंधरा लाखापर्यंत खर्च लागतो पण वेगवेगळ्या धर्मादाय संस्था आणि एनजीओच्या मदतीने उदा. टाटा, सिद्धिविनायक, लालबाग,अशा काही संस्थांकडून निधी पुरवला जाऊ शकतो. लोकसहभागातून जर अशा खर्चिक शस्त्रक्रिया पार पाडल्या तर हजारो कर्णबधीरांना नवे आयुष्य देता येणे शक्य होते.
कर्ण हॉस्पिटल बनला कर्णबधीरांचा एकमेव आधार
|