बातम्या
बेळगावात मराठी महामेळाव्याला कर्नाटक सरकारचा विरोध; नेत्यांना प्रवेशबंदी
By nisha patil - 10/12/2024 6:18:10 PM
Share This News:
बेळगावात मराठी महामेळाव्याला कर्नाटक सरकारचा विरोध; नेत्यांना प्रवेशबंदी
बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने सीमावर्ती भागांत तणाव वाढला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून, महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सीमेवर नाकाबंदी लागू करण्यात आली असून, बेळगावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाकरे गटाने कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन केल्याने कर्नाटक पोलीस सतर्क झाले आहेत. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळला आहे.
बेळगावात मराठी महामेळाव्याला कर्नाटक सरकारचा विरोध; नेत्यांना प्रवेशबंदी
|