बातम्या

करवीर गर्भलिंग निदान 1 अटक ; 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी....

Karveer Garbhlinga diagnosis 1 rescue March 12 police custody


By nisha patil - 11/3/2024 7:20:05 PM
Share This News:



अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी एका संशयित महिलेला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलय. भारती कृष्णात फराकटे अस तिचे नाव असून  असून न्यायालयाने तिला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं 18 जानेवारी 2024 ला
 

 नवीन वाशी नाका परिसरात छापा कारवाई करत गर्भलिंग निदान आणि आवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.यापूर्वी करवीर पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतलय.दरम्यान आज या प्रकरणी करवीर पोलिसांनी कागल तालुक्यातील फराकटेवाडी इथ राहणारी एजंट भारती कृष्णात फराकटे हिला ताब्यात घेतलय. दरम्यान संशयित एजंट भारती फराकटे हिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तिला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.संबधीत महिलेवर यापूर्वी देखील करवीर  पोलिसात गुन्हा दाखल आहे.


करवीर गर्भलिंग निदान 1 अटक ; 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी....