बातम्या

करवीर-हातकणंगले तालुक्याची पहिल्या चार तासात आघाडी

Karveer Hatkanangle taluka lead in the first four hours


By nisha patil - 7/5/2024 4:13:07 PM
Share This News:



कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर असा सामना हातकणंगले लोकसभेसाठी रंगला आहे. सकाळपासूनच उत्साहाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे.
 

पहिल्या चार तासांमध्ये कोल्हापूरमध्ये पहिल्या चार तासांमध्ये कोल्हापुरात 23.77 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये हातकणंगले तालुक्यात आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद पहिल्या चार तासांमध्ये झाली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात 20.56 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल तालुक्यामध्ये 23.18 टक्के मतदानाची नोंद झाली. करवीर तालुक्यात 31.95 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तर मध्ये 23.24 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिण मध्ये 22.55 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये 21.49 टक्के मतदानाची नोंद झाली.


करवीर-हातकणंगले तालुक्याची पहिल्या चार तासात आघाडी