बातम्या
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दानपेटीत तब्बल पावणे 13 कोटीहून अधिक दान
By nisha patil - 1/1/2025 11:08:34 PM
Share This News:
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दर दिवशी हजारो भाविक येत असतात.यावेळी सढळ हाताने मदत म्हणून विविध स्वरूपात दान करतात.यामध्ये 2024 सालामध्ये तब्बल बारा कोटी 76 लाख 5 हजार 338 रुपयांचे रक्कम दानपेटी मधून प्राप्त झालीय.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.तर भाविक सढळ हाताने विविध स्वरूपात दान करतात तर देवस्थान समितीच्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये 1,90,99,186, फेब्रुवारी 2024 मध्ये 97,21,928 मार्च 2024 1,33,43,670 मे 2024 1,18,08,290 जुलै 2024 1,58,92,701 सप्टेंबर 2024 1,84,04,070 तर ऑक्टोंबर 2024 1,14,43,210 डिसेंबर 2024 1,98,92,338 अशाप्रकारे एकूण बारा कोटी 76 लाख 5 हजार 338 रुपये इतके दान प्राप्त झाले आहे अशी माहिती पश्चिम देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दानपेटीत तब्बल पावणे 13 कोटीहून अधिक दान
|