बातम्या
करवीर पोलिसांना १२ लाख ५० हजारचा मुद्देमाल शोधण्यात यश
By nisha patil - 12/13/2023 3:47:06 PM
Share This News:
करवीर पोलीस ठाणे हद्दीत गहाळ मोबाईलच्या गुन्हयातील मोबाईल संचाचे IMEI No एकत्र करुन सायबर पोलीस ठाणे मार्फत हरविलेले मोबाईल शोधणेसाठी जयश्री देसाई, अपर पोलीस अधीक्षक , यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस अधिकारी अजित टिके, अरविंद काळे करवीर पोलीस यांनी विशेष प्रयत्न केले
.
याकामी पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दावणे, रणजित पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती या मोबाईल शोध पथकांनी मागील महिन्यापासुन तांत्रीक तपास करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयातुन व कर्नाटक राज्यातुन ३५ मोबाईल संच अंदाजे ३,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
तसेच करवीर पोलिसात नोंद गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपी कडुन १५० ग्रॅम वजनाची ९,००,०००/- रुपये किंमतीची सोन्याचलगड जप्त केली आहे ती लगड गुन्ह्यातील फिर्यादी यांना परत दिली आहे तसेच मोबाईल संच हे मुळ मालकांना त्याचेकडील मोबाईलची कागदपत्रांची ओळख पटवुन परत देण्यात आले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत ,जयश्री देसाई, अरविंद काळे,रविंद्र कळमकर यांचे हस्ते मोबाईल संच आज फिर्यादीदार यांना देण्यात आले
नागरीकांना त्याचे हरवलेले मोबाईल मिळून येतील असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल संच मिळालेने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे भविष्यात देखील असे तांत्रीकविश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल संच नागरीकांना परत करण्यात येणार असुन हि मोहिम यापुढे हि यशस्वीरीत्या राबविण्यात येणार आहे.
करवीर पोलिसांना १२ लाख ५० हजारचा मुद्देमाल शोधण्यात यश
|