बातम्या
दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफ.आर.पी अधिक १०० रूपयेच्या मागणीसाठी काटा बंद ठिया आंदोलन
By nisha patil - 5/12/2023 10:59:04 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ. आर. पी अधिक १०० रूपये दराची घोषणा केली असून आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफ.आर.पी अधिक १०० रूपयेच्या मागणीसाठी काटा बंद ठिया आंदोलन सुरू केले आहे. दालमिया कारखान्याने एफ. आर. पी मध्ये मोडतोड केल्याने संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दालमिया प्रशासनाचे अधिकारी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांच्यात ऊस दरा संदर्भात झालेली बैठक निष्पळ ठरली असून कारखाना प्रशासन सकारात्मक निर्णय घेण्यास वरिष्ठ कार्यालयाचे कारण सांगून टाळाटाळ करू लागले आहे. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखाना प्रशासन व जिल्हाधिकारी ३२०० रुपयावर ठाम असून एफ. आर. पी मध्ये ८४ रूपयाची कपात करून कारखान्याने एफ. आर. पी. मध्ये मोडतोड केलेली आहे.
यामुळे मंगळवारी सकाळी दत्त दालमिया कारखान्याच्या गेटसमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जमावाने कारखान्याचा काट बंद करण्यासाठी गेले. काटा बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी रोखून धरल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे काटा गेटसमोरच राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. पन्हाळा परिसरातील गावामधून आंदोलस्थळी भाकरी घेवून शेतकरी येवू लागले आहेत तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर मंडप मारून चूल पेटवून जेवणाची तयारी सुरू केली आहे.
दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफ.आर.पी अधिक १०० रूपयेच्या मागणीसाठी काटा बंद ठिया आंदोलन
|