बातम्या
खासदारकीला श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे?काटा लढत होणार?
By nisha patil - 3/23/2024 4:53:14 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे ठाणे: प्रतिनिधी महाराष्ट्रात लक्षवेधी असलेल्या लढतीत ठाणे आणि कल्याणच्या जागा या सुरुवातीपासूनच ठाकरे गटाच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती आहे. त्यामध्ये ठाकरे गटाकडून ठाण्यातून राजन विचारे हेच. लढणार हे नक्की आहे. पण कल्याणमधून कोण उमेदवार उभा करायचा यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे कधी आदित्य ठाकरे यांचे नाव तर कधी सुषमा अंधारे यांचे नाव चर्चेत होतं. सुषमा अंधारे यांनी तर कल्याणमधील अनेक ठिकाणच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या.
पण आता कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून मोठी चाल खेळण्याची तयारी सुरू केलीय. ज्या स्व. आनंद दिघेंचे नाव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण करतात त्या दिघेंच्या पुतण्यालाच, केदार दिघे यांनाच श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तिकीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. असं जर झालं तर श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मोठं आव्हान असेल.
कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचं अनेकदा चव्हाट्यावर आलं आहे. त्यातूनच डोंबिवलीमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या गणपत गायकवाडांनी शिवसेनेच्या महेश गायकवाडांवर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटनाही घडली होती.
खासदारकीला श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे?काटा लढत होणार?
|