बातम्या
श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची २१ ते २४ जानेवारी अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया
By nisha patil - 1/20/2025 11:20:59 AM
Share This News:
कोल्हापूर, श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थानाची मूळ मूर्ती २१ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत भारतीय पुरातत्व विभागाच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी घेतली जाणार आहे. यामुळे या कालावधीत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. मात्र, भाविकांसाठी उत्सवमूर्ती आणि कलश दर्शन मंदिरातील कासव चौक येथे उपलब्ध असतील. देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविकांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची २१ ते २४ जानेवारी अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया
|