बातम्या

काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे

Keep heart diseases at bay


By nisha patil - 1/3/2024 7:38:01 AM
Share This News:



 मीठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाबावर हानिकारक प्रभाव पडतो. यामुळे कालांतराने हृदयरोग होऊ शकतात. आहारातून मीठ कमी केल्यास हृदयरोग होण्याची शक्यता 25 टक्क्यांनी कमी होते. तसेच हृदयरोगांमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यताही 20 टक्क्यांनी कमी होऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्याने कालांतराने किडनीचे नुकसान होऊ शकते. हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काळ्या मिठाचा (सेंधे मीठ) वापर करावा. आयुर्वेदानुसार, काळ्या मिठात 80 प्रकारची खनिजे असल्याने याचा आहारात समावेश केल्याने विविध आजारांपासून बचाव होतो.

काळ्या मिठाचे फायदे

1 केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांतील कोंडा, केसगळती तसेच केस दुभंगणे अशा समस्या दूर होतात.2 शरिरातील आयर्नचे प्रमाण वाढते.

3 यातील कॅल्शिअम आणि पोटॅशिअममुळे स्नायू मजबूत होतात.

4 पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे.

5 वजन कमी करण्यास मदत होते.

6 अंगदुखीवर गुणकारी आहे.

7 यातील पोषक तत्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

8 उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

9 कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते


काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे