बातम्या

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

Keshavrao Bhosle Theater in Kolhapur was gutted by fire


By nisha patil - 8/8/2024 11:27:06 PM
Share This News:



कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली, या आगीत नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, संपूर्ण नाट्यगृह परिसरात आगीचे लोट पाहायला मिळाले, महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले असले तरी. आगीचे प्रमुख कारण अद्याप स्पष्ट नाही. अग्निशामक विभागाकडून तात्काळ या घटनेची दखल घेण्यात आली असून अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. अशी माहिती स्थानिकांमधून समोर येत आहे.  

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यकर्मी स्व.केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशीच नाट्यगृहला आग लागावी ही दुर्दैवी घटना आहे. असं बोललं जात आहे.आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग