बातम्या
खंडोबा तालीम व युथ आयकॉन कुष्णराज महाडिक यांच्या वतीने ५ लाखांची बक्षिसे असणाऱ्या के एम फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 2/19/2024 9:07:44 PM
Share This News:
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : कोल्हापूर खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी ४ वाजता यास्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. ३ मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेते संघाला २ लाख रूपये, उप विजेत्या संघाला १ लाख, तृतीय आणि चतूर्थ विजेत्याला ४० हजार रुपयांच बक्षिस विभागून दिली जाणार आहेत. कौशल्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन घडवणार्या खेळाडूंनाही बक्षिस दिली जाणार असल्याची माहिती कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम फुटबॉल संघाचे अध्यक्ष युवराज बचाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा, तसच येणार्या काळात देशभरातील लिग सामने खेळण्यासाठी कोल्हापूरची टीम तयार करण्याच्या उद्देशान खंडोबा तालीम आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीन के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आलय. या स्पर्धेबाबत माहिती देताना कृष्णराज महाडिक म्हणाले, कोल्हापुरात दर्जेदार फुटबॉल खेळाडू आहेत, पण त्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन मिळत नाही. चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन कोल्हापूर शहराची टीम तयार करण्यासाठी के. एम. चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून, २० फेब्रुवारीला स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धच उद्धाटन श्रीमंत शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते या स्पर्धच सोमवारी स्पर्धेत एकूण १८ संघ सहभागी होणार आहेत. बाद फेरी आणि लिग पद्धतीने होणार्या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख, उपविजेत्या संघाला १ लाख रुपये, तृतीय आणि चतुर्थ विजेत्याला ४० हजारांची बक्षिस आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट प्लेअर यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतून कोल्हापुरातील चांगले खेळाडू समोर येतील, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. बाद फेरीदरम्यान रोज दोन सामने होणार आहेत, तर लिग सामने रोज एक होतील. ३ मार्चला अंतिम सामना होणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खंडोबा फुटबॉल संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पोवार, आशिष जरग, संकेत सुर्यवंशी, अजिंक्य जाधव, आशिष बराले, श्रीकांत मोहिते, विश्वास पोवार, राजेंद्र चव्हाण, सचिन पोवार, चंद्रकांत सुर्यवंशी, ओंकार जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खंडोबा तालीम व युथ आयकॉन कुष्णराज महाडिक यांच्या वतीने ५ लाखांची बक्षिसे असणाऱ्या के एम फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
|