बातम्या
सौंदत्ती यात्रेसाठी 'एस्.टी.'चा 'खोळंबा आकार' २० रुपये आकारण्यात येणार !
By nisha patil - 8/12/2023 3:31:29 PM
Share This News:
कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून २०० हून अधिक एस्.टी. गाड्यांतून भाविक जातात. या यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने 'खोळंबा आकार' प्रतितास ९८ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे.
कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या एसटीचे दर३०० रुपये किलोमीटरप्रमाणे दर न लावता प्रत्यक्ष चालवण्यात आलेल्या किलोमीटरला ५५ रुपयांप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली.डिसेंबरमध्ये होत असलेली यात्रा आणि वर्ष २०२४ मध्ये माघ मासात होणारी यात्रा अशा दोन्हींसाठी हे लागू असेल. रेणुका भक्त संघटनेने महिलांना अर्धे तिकीट मिळावे, अशी मागणी केली असून त्यासाठी पुढच्या वर्षी प्रयत्न करू.'' असेही त्यांनी सांगितले
सौंदत्ती यात्रेसाठी 'एस्.टी.'चा 'खोळंबा आकार' २० रुपये आकारण्यात येणार !
|