बातम्या

पुण्यात खळबळ! पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतःला संपवलं

Killed his wife and nephew and killed himself


By nisha patil - 7/24/2023 4:40:41 PM
Share This News:



पुण्यात खळबळ!  पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतःला संपवलं

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर  परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.मोनी गायकवाड  पुतण्या दीपक गायकवाड  अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वत:चं आयुष्य देखील संपवलं  आहे. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त  म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यातल्या घरी आले होते.

चतु:शृंगी पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. नेमकी ही हत्या करण्याचं कारण काय? आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी बीडमध्ये  घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यात खळबळ! पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतःला संपवलं