किंग खानची मुलगी सुहाना खान हिचे नवीन फोटो शूट, फोटो झाले व्हायरल

King Khans daughter Suhana Khans new photo shoot photos went viral


By nisha patil - 6/30/2023 5:30:20 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम नुकतंच सुहाना खान हिने फोटो शूट केले आहेत. ज्यामध्ये सुहाना ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे ग्लॅमर फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.या लूकमधील फोटोंना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. हे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत. या फोटोत सुहानाचा पांढरा ड्रेस, मेकअप, हेअर स्टाईल आणि चेहऱ्यावरील भाव सगळंच जबरदस्त ग्लॅमरस दिसत आहे.फोटोग्राफर साशा जयराम हिने हे फोटो शूट केले आहेत. सुहानाचे हे सर्व फोटो साशानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यासोबत या फोटोंमध्ये तिने सुहानालाही टॅग केलं आहे.या नवीन लूकसाठी सुहानानं पांढरा ड्रेस आणि न्यूड मेकअप केल्याचं दिसत आहे. मेकअप आर्टिस्ट रिद्धीमा शर्मा हिने सुहानाचा मेकअप केला आहे.या फोटोवर सुहानाच्या चाहत्यांनी आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुहानाची खास मैत्रिण श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली हिनेही या फोटोवर हृदयस्पर्शी इमोजी पोस्ट केल्याचं दिसत आहे.हाना खानची बालपणीची मैत्रिण शया फोटावर  कमेंट्स दिली आहे.एका यूजर्सने प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, कितना हसीन चेहेरा हैं! तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलंय की, सुहाना खूपच सुंदर मुलगी आहे.नाया कपूर हिनेही या फोटोवर Wow अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत तिने यावर अनेक प्रकारच्या इमोजीही पोस्ट केल्या आहेत.सुहाना ही जोया अख्तर यांच्या 'द आर्चिज' या सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.या सिनेमात सुहानासोबत नव्या नंदा हिचा भाऊ अगस्त नंदा, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर, युवराज मेंडा आणि मिहिर आहुजा या स्टार किड्सच्याही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


किंग खानची मुलगी सुहाना खान हिचे नवीन फोटो शूट, फोटो झाले व्हायरल